टीव्ही, लॅपटॉप, गिझरसह ७ लाखांचा ऐवज चोरला

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारागृहात असलेले प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांच्या आलिशान बंगल्यातून चोरट्यांनी 6 लाख 95 हजारांचा ऐवज चोरून नेला. सेनापती बापट रस्त्यावरील सप्तश्रृंगी हा बंगला सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) 2019 मध्ये सील करण्यात आला होता.

याप्रकरणी डी.एस.कुलकर्णी यांची सून भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रूपये घेत डी. एस. कुलकर्णी यांनी फसवणूक केली. याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे कुटुंबीय सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल करून पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील बंंगला 2019 मध्ये सील केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बंगल्यामध्ये चोरी झाल्याची माहिती भाग्यश्री कुलकर्णी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ईडी प्रशासनाला पत्रव्यवहार करून माहिती दिली. त्यानंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी पंचासह बंगल्यात पाहणी केली असता, चोरी झाल्याचे दिसून आले. ईडीने पोलिसांना पत्र लिहून तपासाचे आदेश दिले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा