नवी दिल्ली : देशातील अनेक औष्णिक वीज प्रकल्प कोळशाच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करत आहेत. यामुळे, अनेक राज्यांवर विजेचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली असताना भारतीय रेल्वे नागरिकांच्या मदतीला धावली. वीज प्रकल्पांपर्यंत कोळसा पोहचवण्याची जबाबदारी रेल्वेने घेतली आहे.

देशात अनेक वीज प्रकल्पांना कोळशाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असल्याने सरकार आणि संबंधित विभाग दक्ष आहेत. अशावेळी, रेल्वे गाड्यांची लोडिंग क्षमता वाढवून औष्णिक वीज प्रकल्पांपर्यंत कोळसा पोहचवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेने घेतली आहे. रेल्वे अधिकार्‍यांनाही सक्रिय राहण्याची आणि प्रत्येक तासाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबतच, प्रत्येक दिवशी भरल्या जाणार्‍या कोळशाच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.

कोळशाची कमतरता ही एक प्रकारे ’आपत्कालीन परिस्थिती’ समजली जात आहे. सर्व झोनल रेल्वेच्या मुख्य संचालक व्यवस्थापकांना नियंत्रण कक्ष तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच, मंत्रालय आणि व्यवस्थापकांना प्रत्येक तासाचे बुलेटीन तयार करण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी एकाच दिवशी 17.7 लाख टन कोळशाचे परिवहन करण्यात आले. गेल्या वर्षी याच दिवसाचा आकडा 14.8 लाख टन होता. कोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या मदतीची आणखीन गरज लागली तर त्यासाठी प्रशासन तयार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा