रशियन डॉक्टरांचा इशारा

मॉस्को : गेल्या दोन वर्षांपासून सर्व जग कोरोना विषाणूशी लढा देत आहे. मात्र, कोरोनाचे संकट संपत नाही तोच जगावर ‘ब्यूबोनिक प्लेग’ महासाथीचे संकट येण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर जागतिक तपमानवाढ कमी झाली नाही, तर प्लेगच्या महासाथीने अनेकांचा जीव जाईल, असा इशारा रशियन डॉक्टरांनी दिला आहे.

या आजाराने यापूर्वीच अनेकांचा जीव घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या आजाराने विविध देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. युरोपात याचा सर्वाधिक प्रसार झाला. तब्बल कोट्यवधी नागरिकांचा यात बळी गेला. या आजाराला ‘काळा मृत्यू’ असेदेखील म्हटले जाते.

रशियन डॉक्टर अन्ना पोपोवा यांनी सांगितले की, जगभरात वाढत्या तपमानामुळे ‘ब्यूबोनिक प्लेग’ साथीचा आजार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. गेल्या काही वर्षात रशिया, अमेरिका, चीन या देशांमध्ये ‘काळा मृत्यू’ आजाराने अनेकांचा बळी गेला. या आजाराचे महाभयानक रूप आफ्रिकेमध्ये पाहायला मिळते. या देशातील उष्ण वातावरणामुळे येथे हा आजार पसरण्याची शक्यता सर्वाधिक आहे. यावर डॉ. पोपोवा यांनी सांगितले की, पर्यावरणात सतत होणार्‍या बदलांमुळे जल आणि वायू प्रदूषणात बदल होत आहे. तपमान मोठ्या प्रमाणात वाढतेय. यामुळेच जगभरात आटोक्यात आलेला ‘ब्यूबोनिक प्लेग’ आजार नव्याने पसरू शकतो. या ‘काळ्या मृत्यू’चा अनेक देश सामना करत आहेत. या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कारण हा आजार पसरवण्यार्‍या डासांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आजाराची लक्षणे

ब्यूबोनिक प्लेग हा आजार ज्या विषाणूमुळे होतो तो ‘यर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरिया’ नावाने ओळखला जातो. हा विषाणू शरीरातील रक्त, फुफ्फुस आणि इतर अवयवांमध्ये पसरतो. या ब्यूबोनिक प्लेगला ‘गिल्टीवाला प्लेग’ नावानेदेखील ओळखले जाते. यामुळे शरीरात असह्य वेदना, खूप ताप येणे, आणि नाडीचा वेग वाढतो.

उंदरांमुळे पसरतो आजार

ब्यूबोनिक प्लेग हा आजार जंगली उंदरांमुळे होतो. उंदराच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील विषाणू डासांद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो. यानंतर ते डास मानवी शरीराला चावा घेत संक्रमित द्रव मानवी शरीरात सोडतात. यामुळे मानवाला ब्यूबोनिक विषाणूचे संक्रमण होते. या उंदरांच्या मृत्यूनंतर दोन आठवड्यांनी मानवामध्ये प्लेग आजार होतो. या काळ्या मृत्यूच्या विषाणूचा वंशवृक्ष 7 हजार वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा