अत्यावश्यक वस्तूंवरील दरनियंत्रण हटविल्याचा परिणाम

कोलंबो : श्रीलंका सरकारने अत्यावश्यक वस्तूंवरील दरनियंत्रण हटविल्याने नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात 90 टक्क्यांची वाढ झाली आहे. 250 रुपयांना मिळणारे एक लीटर दूध आता 1,195 रुपयांना मिळत आहे. या दरवृद्धीने कमालीचा असंतोष पसरला असून समाज माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली मागील गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दरनियंत्रण हटविण्याचा निर्णय झाला होता. नियमित घरगुती सिलिंडरचे दर गेल्या शुक्रवारी 1,400 रुपये होते. ते आता 2,657 रुपयांवर पोहोचले आहेत. याप्रमाणे कणीक, साखर आदी अन्य आवश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सिमेंटचेही दर वाढले आहेत.

सरकारने तातडीने दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत. ‘पुरवठा अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी मंत्रिमंडळाने दूध पावडर, कणीक, साखर आणि सिलिंडर गॅसवरील दरनियंत्रण हटविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने किमती सुमारे 37 टक्क्यांनी वाढतील हाही अंदाज होता. मात्र, नफेखोर मनमानी किमती वाढवतील असे वाटले नव्हते’, अशी प्रतिक्रिया ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा