नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारपदी माजी आयएएस अधिकारी अमित खरे यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. खरे हे 1985 च्या बॅचचे अधिकारी असून 30 सप्टेंबर रोजी ते उच्चशिक्षण सचिव पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन ’राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’ ला मंजुरी दिली होती. खरे यांनी बिहारमधील पशुखाद्य गैरव्यवहार उघडकीस आणला होता. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा