सातारा, (वार्तहर) : हिरकणी रायडर शुभांगी पवार (वय 32) हिचा मालमोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे मंगळवारी सकाळी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मोलमोटार डोक्यावरून गेल्याने शुभांगी पवार यांचा जागिच मृत्यू झाला.

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी बाहेर पडल्या. 1 हजार 868 किमी प्रवासासाठी त्या मोटारसायकलने निघाल्या होत्या. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर येथे पोहचल्या. पुढे आई तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर पुढे माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी ते सर्वजण जात होते. त्यावेळी भोकर फाटा दाभड येथे शुभांगी यांच्या दुचाकीचा अपघात झाला. मोलमोटारीची जोरदार धडक बसल्याने शुभांगी जागीच ठार झाल्या. अपघातानंतर शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर (जि. नांदेड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले आहे. ही यात्रा दहा जिल्हे, 25 तालुके, एक हजार 868 किलोमीटर प्रवास करुन शुक्रवारी 15 ऑक्टोबर सातारा येथे सांगता होणार होती. ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता. या यात्रेला सातारा येथील पवई नाका परिसरातील शिवतीर्थपासून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला होता. ही यात्रा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नांदेडमार्गे माहुरला जात होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा