मोदींचे प्रतिपादन; इंडियन स्पेस असोसिएशनची सुरुवात

नवी दिल्ली : ’जेव्हा आम्ही अंतराळ सुधारणांबद्दल बोलतो, तेव्हा आमचा दृष्टिकोन 4 खांबांवर आधारलेला असतो. पहिले, खासगी क्षेत्राला नवीन कल्पना करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. दुसरे म्हणजे, लोकांना सक्षम बनवणारी सरकारची भूमिका. तिसरे, युवकांना भविष्यासाठी तयार करणे आणि चौथे, अंतराळ क्षेत्राला सामान्य माणसाच्या प्रगतीचे साधन म्हणून पाहणे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी इंडियन स्पेस असोसिएशनची सुरुवात केली. यावेळी अंतराळ उद्योगाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, ’भारतात असे निर्णायक सरकार कधीच नव्हते. अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञानासंदर्भात आज भारतात ज्या प्रमुख सुधारणा होत आहेत, हा त्याचा दुवा आहे. इंडियन स्पेस असोसिएशन म्हणजेच इस्पाच्या स्थापनेसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. 130 कोटी देशवासीयांच्या प्रगतीसाठी भारतीय अंतराळ क्षेत्र हे एक उत्तम माध्यम आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा