नवी दिल्ली : देशात आठवडाभरापासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 30 पैशांची आणि डिझेलच्या दरात 35 पैशांची वाढ झाली. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपयांवर पोहोचले. तर डिझेल 93.17 रुपये दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 29 पैशांनी आणि डिझेल 37 पैशांनी महाग झाले. त्यामुळे पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये दराने मिळत आहे. गेल्या 11 दिवसांत दोन दिवस वगळता सातत्याने इंधनात वाढ झाली. या काळात पेट्रोल प्रतिलीटर 2.80 रुपये आणि डिझेल 3.30 रुपयांनी महाग झाले. देशातील बहुतांश ठिकाणी पेट्रोल शंभरीपार गेले आहे. अनेक ठिकाणी डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा