नवी दिल्ली : देशभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना लसीकरणाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात येण्याची चिन्ह निर्माण झालेली असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय येत्या १८ ऑक्टोबरपासून अर्थात सोमवारपासून देशभर लागू होणार आहे.

या वर्षी जुलै महिन्यात बऱ्याच कालावधीनंतर प्रवासी विमानवाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यात आली होती. १ जुलै ते ५ जुलै दरम्यान देशातील विमान कंपन्यांना ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते १२ ऑगस्ट या जवळपास सव्वा महिन्यात प्रवाशांची मर्यादा ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. पुढे १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीमध्ये ही मर्याता ७२.५ टक्के इतकी वाढवण्यात आली होती. तर १८ सप्टेंबरपासून या महिन्यात १८ ऑक्टोबरपर्यंत ही मर्यादा ८५ टक्के इतकी नेण्यात आली आहे. अर्थात, १८ ऑक्टोबरपर्यंत देशातील विमान कंपन्यांना ८५ टक्के प्रवासी क्षमतेने उड्डाण करता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा