पुणे : एकीकडे महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफीत मुक्त करून दिलासा देत असताना दुसरीकडे केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या जीवावर उठले आहे. शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्यासाठी हिंसक पद्धत वापरली जात आहे.

रावणाचा मुखवटा झाकून श्रीरामाचा जप करणार्‍या भाजपच्या रावणाचे दहन करण्यासाची वेळ आली आहे, अशी घणाघाती टिका अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे.

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक पद्धतीने चिरडण्यात आले, त्याच्या निषेधार्थ सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. पुण्यात तीनही पक्षांतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करून बंदला पाठींबा देण्यात आला. यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीतर्फे आक्रोश सभेचे आयोजन करण्यात केले. यावेळी कदम यांनी केंद्र सरकारवर हल्ला बोल केला.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार तसेच तीनही पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनातील सदस्य उपस्थित होत.

कदम म्हणाले, ‘मागील दीड वर्षापासून हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना ते आंदोलन मोडून काढण्यासाठी शेतकर्‍यांवर गोळीबार केला आहे. आता लखीमपूर येथील घटना घडली आहे. ज्या बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जाते, त्या बळीराजाला चिरडण्यासाठी केंद्र सरकार येनकेन प्रकारचे प्रयत्न करत आहे. भाजपच्या या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीनही पक्षांनी एकत्र येणे गरजेचे होते; म्हणून आम्ही एकत्र येऊन या प्रवृत्तीचा नायनाट करण्याचा निर्धार केला आहे.’

‘आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई‘ या गीतासह मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसरात निषेध व्यक्त करण्यात आला. परिसरातील वाहतूक कोंडी पाहना वाहनांचे मार्ग बदलण्यात आले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

देशात स्वायत्तता असणार्‍या सुरक्षा यंत्रणा, एजन्सी, केंद्रीय यंत्रणांचा वापर भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना, नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना लक्ष करण्यासाठी करत आहे. ही अत्यंत चुकीची बाब असून भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा