नवी दिल्ली : देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर पोहोचले आहे. सक्रिय रुग्णसंख्या सवा दोन लाखापर्यंत खाली आली आहे. नव्या रुग्णांची नोंदही 20 हजारांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18 हजार 132 नवे रुग्ण आढळून आले. तर, 193 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना रुग्ण संख्या 3 कोटी 39 लाख 71 हजार 607 वर पोहोचली. तर, आतापर्यंत 4 लाख 50 हजार 782 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. गेल्या 24 तासांत 21 हजार 563 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 93 हजार 478 जणांनी कोरोनावर मात केली. देशात सध्या 0.67 टक्के म्हणजे 2 लाख 27 हजार 347 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा