देशात कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिल्याचे वृत्त होते. मात्र आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) लसीच्या वापरासाठी मान्यता दिली नसल्याचे सांगितले. वृत्तसंस्था एएनआयने अधिकृत सुत्रांनी ही माहिती दिली आहे.भारतात विकसित झालेल्या कोरोना लस कोव्हॅक्सिनचे निर्माता भारत बायोटेकने शनिवारी २-१८ वयोगटातील मुलांसाठी चाचणी डेटा DCGI ला पाठवला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.कृष्णा एला यांनी ही माहिती दिली.मूल्यमापन अद्याप सुरू आहे. काही गोंधळ आहे आणि तज्ज्ञ समितीशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) त्याला मान्यता दिलेली नाही.” अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.

लहान मुलांवर केलेल्या कोरोना लसीच्या चाचणीचे निकाल समाधानकारक आहेत. यामध्ये तीन चाचण्या झाल्या आहेत. चाचणीचे निकाल DCGI ला सादर केले आहेत. अशा परिस्थितीत, लवकरच कोव्हॅक्सिनला मान्यता मिळू शकते. तसेच लसीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सरकारकडून मुलांना जारी केली जाऊ शकतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा