नवी दिल्ली : कोळशाच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे देशाच्या अनेक भागांत विजेची कमतरता जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जामंत्री आर. के. सिंह, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह कोळसा आणि ऊर्जा मंत्रालयाचे प्रभारी उपस्थित होते. सुमारे तासभर ही बैठक चालली. या बैठकीत वीज प्रकल्पांमधील कोळसा उपलब्धता आणि विजेची मागणी यावर चर्चा झाली. वीज संकटावर तोडगा काढण्यासाठी कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयाने आपत्ती गटाची स्थापना केली असल्याचे वृत्त आहे.

कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट घोंगावत आहे. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्तान, दिल्ली, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये वीज उत्पादनात अडचणी येत आहेत.

सध्या खाणींमध्ये सुमारे 40 दशलक्ष टन आणि वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये 7.5 दशलक्ष टन साठा आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी देशात विजेची उपलब्धता व्यवस्थित असून, कोळशाची कमतरता नाही, अशी प्रतिक्रिया नुकतीच दिली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा