मुंबई : प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे सर्वांत चांगले आणि स्वस्त वाहतुकीचे साधन आहे. रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. तसेच प्रवाशांना स्टेशनवर सोडायलाही अनेक लोक येत असतात. अशा व्यक्तींना या पूर्वी केवळ फलाटाचे तिकीट काढावे लागत होते. मात्र, आता त्यांना व्हिजिटर फीदेखील भरावी लागणार आहे. ज्याला यूजर्स चार्जेस असे नाव देण्यात आले आहे. राज्यासह देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना हा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

आयआरएसडीसी आणि आरएलडीए यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. त्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. केंद्रीय कॅबिनेटसमोर याविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला. आयआरएसडीसी लवकरच याबाबत सूचना काढणार आहे. विमानतळाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. आयआरएसडीसी आणि आरएलडीए या संस्था रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी काम करत आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सीएसएमटी, कल्याण, ठाणे, ठाकुर्ली, एलटीटी यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यूजर्स चार्ज हे प्रवाशांच्या तिकीटाच्या रकमेमध्येच समाविष्ट केले जाणार आहेत.

१० ते ४० रुपये युझर्स चार्ज

प्रवशांना 10 ते 40 रुपये अतिरिक्त यूजर्स चार्जेस द्यावे लागणार आहेत. तिकिटाच्या दरानुसार हे चार्जेस ठरवले जाणार आहेत. प्रवाशांना रेल्वे फलाटावर सोडायला येणार्‍या व्यक्तीला केवळ फलाट तिकीट काढावे लागत होते; मात्र आता त्या व्यक्तीला यूजर्स चार्जदेखील द्यावा लागेल, असे आयआरएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. लोहिया यांनी सांगितले. या संदर्भात लवकरच सूचना निघाल्यानंतर चार्जेस लागू होतील, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा