आर्यनची तुरुंगात रवानगी

मुंबई: मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन खानसह इतर आरोपींचा जामीन अर्ज नाकारला आहे. हा आर्यन खान याच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. आर्यन खानला आता जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खानला तुरुंगात राहावे लागणारआहे.

मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर सारिका, विक्रांत चोकेर, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा यांना अटक केले होते. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक केलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली.

आर्यन खानला आज जामीन मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आज आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामिनासाठी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले.अडीच तासांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला.आता या निकालानंतर आर्यन खानला काही दिवस मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा