प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

मुंबई, (प्रतिनिधी) : सक्तवसुली संचालयानयापाठोपाठ (ईड) आता प्राप्तीकर विभागही महाराष्ट्रात सक्रिय झालाॠ प्राप्तीकर विभागाने गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा, त्यांच्या तिन्ही भगिनी तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्ता व संस्थांवर छापे टाकले. पवार यांच्याशी संबंधित साखर कारखाने तसेच संचालकांच्या मालमत्तांवरही छापासत्र सुरू आहे.

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या मुंबईतील कार्यलयावरही प्राप्तीकर विभागाने छापा मारला. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीॠ आपल्याशी संबंधित संस्थांवर सुरू असलेला कारवाईबाबत आपल्याला काहीही म्हणायचे नाही, परंतु, या संस्थांशी दुरान्वये संबंध नसताना केवळ रक्ताचे आहे म्हणून बहिणींच्या घरावर छापा घातल्याचे वाईट वाटले. राजकारण कोणत्या पातळीवर गेले, हेच यावरून दिसून येत असून लोक याची योग्य दाखल घेतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली

जरांडेश्वरसह काही साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहाराची चौकशी प्राप्तीकर विभागाने आधीच सुरू केली होती. त्याच प्रकरणात काल अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची घरे व संस्थांच्या कार्यालयावर काल प्राप्तीकर विभागाने मोठ्या फौजफाटा घेऊन एकाच वेळी छापे टाकले. सातार्‍यातील जरंडेश्वर कारखान्याबरोबरच दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर व त्यांच्या काही संचालकांच्या घरावर धाडी घालण्यात आल्याचे समजते. एवढेच नव्हे तर अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील एक व पुण्यात वास्तव्य असलेल्या दोन बहिणींच्या मालमत्तावरही प्राप्तीकर विभागान छापा टाकला. स्थानिक पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांची मदत घेऊन प्राप्तीकर विभागाने हे छापासत्र सुरू केले आहे. बारामतीच्या अंबालिका साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या काटेवाडीतील घरावरही छापा घालण्यात आल्याचे समजते.

सर्व कर भरला आहे

आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत कारण मी स्वतः अर्थमंत्री आहे. आर्थिक शिस्त कशी लावायची… कर चुकवायचा नाही… कर व्यवस्थितपणे कसा भरायचा हे मला माहीत आहे. माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचे कर व्यवस्थितपणे वेळच्या वेळी भरले जातात. त्यात काही अडचण नाही. आता ही राजकीय हेतूने छापा टाकला की प्राप्तीकर विभागाला आणखी काही माहिती हवी होती ते प्राप्तीकर विभागाच सांगू शकेल, असेही अजित पवार म्हणाले. छापेमारी कोणावर करावी हा प्राप्तिकर विभागाचा अधिकार आहे. पण केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या एकातरी नेत्यावर आजवर कारवाई झाली आहे का? असा सवालही त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा