मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर सहा जणांना मुंबई न्यायालयाने गुरुवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आर्यनने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या अर्जावर आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी एका क्रूझवर (मोठ्या जहाजातून) छापा टाकत आठ जणांना ताब्यात घेतले होते. पाच जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. त्यानंतर, आणखी काही जणांना अटक केली. आतापर्यंत 17 जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. आर्यनला याआधी मुंबईतील किल्ला न्यायालयाने सुरवातीला एका दिवसांची, नंतर तीन दिवसांची एनसीबीची कोठडी सुनावली होती. त्याची मुदत काल संपणार होती. त्यामुळे आर्यनला न्यायालयापुढे उभे करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा