पुणे : थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर राज्यासह देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. तसेच पुणे शहर आणि परिसरातून महाबळेश्वर जाणार्‍या संख्याही लक्षणीय आहे. पुण्यातील पर्यटकांना सुट्टीच्या दिवशी महाबळेश्वर पर्यटन करता यावे, या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातर्फे स्वारगेट बस स्थानकातून दर रविवारी महाबळेश्वर दर्शनसाठी विशेष हिरकरणी बस सोडली जाणार आहे.
स्वारगेट-महाबळेश्वर-स्वारगेट ही बस दर रविवारी सकाळी 7 वाजता स्वारगेट येथून महाबळेश्वरसाठी रवाना होईल. आर्थर पॉईंट, केट्स पॉईंट, स्ट्रॉबेरीपॉईंट, क्षेत्र महाबळेश्वर, पंचगंगा मंदिर, सनसेट पॉईंट या सुप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन रात्री 9 वाजता ही बस स्वारगेट बस स्थानकात पोहचेल. या बसचे दिवसभराचे तिकीट 480 रूपये असणार आहे. प्रवाशांना स्वारगेट महाबळेश्वर बसचे आगाऊ आरक्षण एसटीच्या संकेतस्थळावरून करता येईल. तसेच या बसचे आरक्षण जवळचे बस स्थानक किंवा अधिकृत तिकीट आरक्षण केंद्रावरूनही करता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा