पुणे : नवरात्रोत्सवात अनेकजण उपवास करतात. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात शेंगदाणाचे दर वाढले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलोमागे 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे. शेंगदाण्याचे दर पुढील दहा ते पंधरा दिवस तेजीत राहणार आहेत. गुजरातमधील शेंगदाण्याची आवक सुरू झाल्यानंतर शेंगदाण्याच्या दरात घट होईल, अशी माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
नवरात्रोत्सवात अनेक जण उपवास करतात. उपवासासाठी शेंगदाणा, भगर, साबुदाण्याच्या मागणीत वाढ होते. साबुदाणा, भगरीचे दर स्थिर असले तरी गेल्या काही दिवसांपासून शेंगदाणा दरातील वाढ कायम आहे. गेल्या पंधरा दिवसात घाऊक तसेच किरकोळ बाजारात शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलोमागे 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे.
खाद्यातेलांचे दर तेजीत आहेत. खाद्यातेल उत्पादकांकडून शेंगदाण्याला मागणी आहे. एकूण मागणी विचारात घेता सध्या बाजारात होणारी शेंगदाण्याची आवक अपुरी आहे. शेंगदाण्याची सर्वाधिक लागवड गुजरात, राजस्तान, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार या राज्यात केली जाते. गुजरातमध्ये 20 ते 25 टक्के शेंगदाण्याची लागवड केली जाते. गुजरातमधील जाडा शेंगदाण्याची आवक दसर्‍यानंतर सुरू होते. त्यानंतर शेंगदाणा दरात घट होऊ शकते. सध्या बाजारात कर्नाटकातील घुंगरू शेंगदाण्याची आवक होत आहे. मागणीच्या तुलनत आवक कमी होत असल्याचेही लोढा यांनी नमूद केले.
खाद्यातेल उत्पादकांकडून शेंगदाण्याला मागणी आहे. शेंगदाण्याची सर्वाधिक लागवड गुजरात, राजस्तान, बिहार, तामिळनाडू, कर्नाटकात केली जाते. त्यातुलनेत महाराष्ट्रात लागवड कमी प्रमाणावर केली जाते. गुजरातमधील शेंगदाण्याचा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. साधारणपणे तीन महिने गुजरातमधील शेंगदाण्याचा हंगाम सुरू असतो. गुजरातबरोबरच राजस्तानातील शेंगदाणा ऑक्टोबर महिन्यात बाजारात विक्रीस दाखल होतो. मार्च महिन्यात तामिळनाडूतील शेंगदाण्याची आवक सुरू होते. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान बिहारमधील शेंगदाण्याची आवक होते. मात्र, यंदा बिहारमधील पूरस्थितीमुळे तेथील शेंगदाण्याची आवक झाली नाही. त्यामुळे बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याचेही अशोक लोढा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा