मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. खडसेंना पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणात ईडीकडून समन्स धाडण्यात आले आहे. तसेच, मुंबई सत्र न्यायालयात ते अनुपस्थित राहिले आहेत. यावेळी खडसेंच्या वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. खडसेंना रुग्णालयात दाखल केल्याच्या माहितीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली. खडसे खोटे बोलून गैरहजर राहिल्याचा आरोप त्यांनी केला. खडसे यांची भोसरी भूखंड प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे. या गैरव्यवहारप्रकरणी खडसे मुंबई सत्र न्यायालयात अनुपस्थित राहिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा