अमरावती जिल्हा बँक निवडणूक

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विजय मिळवला आहे. मात्र, सत्तेचा कल महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे दिसत आहे. बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर आमने-सामने आले होते. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक सोमवारी पार पडली.

या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मते मिळाली, तर बबलू देशमुख यांना 19 मते मिळाली. त्यामुळे 3 मतांनी बच्चू कडू विजयी झाले. यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनेल 8 जागांवर, तर बच्चू कडू यांचे परिवर्तन पॅनेल 4 आणि अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच बिनविरोध निवडून आलेल्या 4 उमेदवारांमध्ये सहकार पॅनेलच्या दोन आणि परिवर्तन पॅनेलच्या दोन उमेदवारांचा समावेश होता.

सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार : विरेंद्र जगताप (चांदूर रेल्वे), श्रीकांत गावंडे ( धामणगाव), सुरेश साबळे (तिवसा), सुधाकर भारसाकडे (दर्यापूर), हरिभाऊ मोहोड (भातुकली), सुनील वर्‍हाडे (अमरावती), दयाराम काळे (चिखलदरा), प्रकाश काळबांडे (सहकारी पतसंस्था).

परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार ः बच्चू कडू (चांदूरबाजार), चित्रा डहाणे (मोर्शी), अजय मेहकरे (अंजनगाव सूर्जी), जयप्रकाश पटेल (धारणी).
विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये अभिजीत ढेपे (नांदगाव खंडेश्वर), नंरेशचंद्र ठाकरे (वरुड), आनंद काळे (अचलपूर) यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा