नवी दिल्ली : देशात इंधनाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. सार्वजनिक तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 25 पैशांची आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर 30 पैशांची वाढ केली. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल 101.34 रुपयांवर पोहोचले. तर, डिझेल 88.77 रुपयांवर पोहोचले. मुंबईत हेच दर अनुक्रमे 107.39 आणि 96.33 रुपये इतके आहे. देशात 18 जुलै ते 23 सप्टेंबर या कालावधीत इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. याउलट, पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 65 पैसे आणि डिझेलच्या दरात 1.24 रुपयांची घट झाली होती. मात्र, 24 स्पटेंबरपासून इंधनाच्या दरात वाढ सुरू असून डिझेल प्रतिलीटर 2.45 रुपयांनी आणि पेट्रोल 1.50 रुपयांनी महागले.

पुण्यातील दर

पेट्रोल : 108.19 रूपये
पॉवर : 111.87 रूपये
डिझेल : 96.82 रूपये
सीएनजी : 59.50 रूपये

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा