मुंबई :अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्या पाठोपाठ अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आणखी चौघांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्याची संख्या आठवर पोहोचली.

अब्दुल कादर कयूम शेख, श्रेयस सुरेंद्र नायर, मनीष उदयराज दर्या आणि अविन दीनानाथ साहू अशी काल अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चौघांनाही वैद्यकीय तपासणीनंतर स्थानिक न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली. याआधी, आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना एनसीबीने अटक केली होती. सध्या ते 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत आहेत.

अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी एका क्रूझवर (मोठ्या जहाजातून) छापा टाकत आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी, पाच जणांची सुटका करण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा