प्रत्येकी पाच लाख बँकेत जमा

मुंबई, (प्रतिनिधी) : कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याची तत्काळ अंमलबजावणी करताना 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे 15 कोटी 30 लाख जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीटरद्वारे दिली.

कोरोनामुळे अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. या बालकांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये, तसेच त्यांच्या भविष्यासाठी काही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा