मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला सोमवारीदेखील दिलासा मिळू शकला नाही. मुंबईतील किल्ला न्यायालयाने आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली. आर्यनसोबतच मुनमुन धमेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांनादेखील न्यायालयाने तीन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली.

अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी एका क्रूझवर (मोठ्या जहाजातून) छापा टाकत आठ जणांना ताब्यात घेतले होते. पाच जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. मात्र, आर्यनसह तिघांना रविवारी वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयासमोर उभे केले होते. त्यावेळी न्यायालयाने एक दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा