पुणे : ह्रदयाची, प्रेमाची भाषा समाजाला जोडून ठेवते. व्यक्ती आणि अभिव्यक्तीची मोट बांधली पाहिजे. आज अंधकारमय स्थिती आहे. स्मृती दडपण्याचा हा काळ आहे. अंधकारमय दिवसांत आपण आपापल्याला गोष्टी सांगाव्यात म्हणजे गुंदमरलेल्या समाजाची तहाण भागेल. राष्ट्र सेवा दल विचारांचा प्रवाह आहे. हा प्रवाह वाहता ठेवण्यासाठी म्हणून राष्ट्र सेवा दलाची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.
‘सेवा दलातील दिवस’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. देवी बोलत होते. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख, इंदुमती जोंधळे, भा. ल. कोरगावकर आदी उपस्थित होते.
भारत सासणे म्हणाले, सर्वत्र भय आणि भितीचे वातावरण आहे. अशा स्थितीत कोणाचे समर्थन आणि कोणाचा विरोध करायचा हे कळत नाही. मात्र जे हुशार लोक आहेत. परिस्थिती पाहून व्यक्त होतात. अशा लोकांपासूनच देशाला धोका आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांनी मंगळवारी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा