काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकारची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच काबुलच्या राष्ट्रपती भवनात त्यांच्या प्रमुख नेत्यांमध्ये मोठा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तालिबानने याचे खंडन केले आहे.

तालिबानचे सहसंस्थापक आणि उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरदार बेपत्ता झाल्यापासून दोन गटांत वाद सुरू झाला. सूत्रांनी सांगितले की, बरदार आणि खलील उर रहमान हक्कानी यांच्या गटांमध्ये झालेल्या भांडणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला. अफगाणिस्तानमधील विजयाचे श्रेय कोणी घ्यायचे यावर वाद सुरू झाल्याचे वृत्त आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा