नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी मोठी घोषणा करत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानवर जाऊन स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा आनंद घेता येईल, अशी माहिती दिली.

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. यातील पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाच वेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

ही स्पर्धा मार्चमध्ये सुरू झाली होती पण खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित ३१ सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा