झारखंड : झारखंडमधील रामगड येथे भरधाव बस आणि मोटार यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसने तत्काळ पेट घेतला. या अपघातात मोटारीतील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.
बस आणि मोटारीमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या मोटारीपर्यंत पोहोचल्या आणि मोटारीतील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामगडजवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले पाचही जण बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. भररस्त्यात बस आणि मोटारीने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, अपघातग्रस्त मोटार बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा