सियोल : मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आणि अ‍ॅप मार्केटमध्ये बाजारातील वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल दक्षिण कोरियाने गुगलला 13.02 अब्ज रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलने यावर आक्षेप घेत या दंडाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच गुगलने दक्षिण कोरियावर बदनामीचा आरोप केला. दरम्यान, दक्षिण कोरियाने सुधारित दूरसंचार कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. गुगल आणि अ‍ॅपल सारख्या अ‍ॅप मार्केट ऑपरेटर्सना अ‍ॅप-मधील खरेदी यंत्रणेसाठी वापरकर्त्यांकडून पेमेंट गोळा करण्यास कायद्याने प्रतिबंध केला आहे. दक्षिण कोरिया हा असा नियम स्वीकारणारा पहिला देश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा