नवी दिल्ली ः दिल्ली पोलिसांनी दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांसह सहा जणांना अटक केली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती दिल्ली पोलिस विशेष दलाचे पोलिस आयुक्त नीरज ठाकुर मंगळवारी यांनी दिली.
नीरज ठाकुर म्हणाले, या संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सहापैकी एक दहशतवादी महाराष्ट्रातील आहे. तीन दहशतवादी उत्तर प्रदेशातील आहेत. तेथील दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली. तर, दोन दहशतवाद्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना मस्कटमार्गे पाकिस्तानात नेण्यात आले. एका फॉर्म हाउसमध्ये त्यांना पंधरा दिवस एके-47 सह स्फोटके आणि बंदुकांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्यासोबत 14 बंगाली भाषक व्यक्ती होते. त्यांनादेखील कदाचित असेच प्रशिक्षण दिले गेले असावे. ते दोघेही नौकेच्या साह्याने भारतात परतले.
सर्व दहशतवादी 22 ते 45 या वयोगटातील अहेत. महमद ओसामा, जीशान कमर, जान महमद अली शेख, महमद अबू बकर, महमद अमीर जावेद आणि मूलचंद लाला अशी त्यांची नावे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा