नवी दिल्ली : सध्याच्या राजकीय परिस्थीतीत, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाचा मार्ग ठरवतील, याबद्दल शंका नाही. ही निवडणुक केवळ मोदी-योगीच नव्हे तर सप-बसप आणि काँग्रेससाठीही तितकीच महत्त्वाची आहे. गांधी कुटुंबाला लक्षात आले आहे की उत्तर प्रदेशमध्ये जर त्यांची कामगिरी चांगली नसेल तर पुढचा रस्ता खूप कठीण असू शकतो. याच कारणामुळे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी स्वत: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, प्रियांका कोणत्या जागेवरून आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे हे अद्याप ठरलेले नाही. पण दिग्गज काँग्रेसजनांच्या मते, प्रियंका यांची पहिली पसंती अमेठी आहे. राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्या अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पोषक वातावरण तयार करू शकतील. यामुळे स्मृती इराणींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान दिले जाऊ शकते. यापूर्वी गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांनी फक्त लोकसभा निवडणूक लढवली आहे. प्रियांका गांधी कुटुंबातील पहिल्या सदस्य असतील ज्या विधानसभा निवडणूक लढवतील. प्रियांका यांनी हा निर्णय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने घेतला आहे.
रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक जागा आहेत. रायबरेलीमध्ये काँग्रेसला आतापर्यंत केवळ 3 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. 1977, 1988 आणि 1996 मध्ये या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला. या जागेवरून फिरोज गांधी, इंदिरा गांधी, शीला कौल, अरुण नेहरू आणि सतीश शर्मा यांनी निवडणूक लढवली आहे. काँग्रेसने 17 लोकसभा आणि अमेठीमध्ये 2 पोटनिवडणुकांमध्ये 16 वेळा विजय मिळवला आहे. राहुल गांधी 2004, 2009 आणि 2014 मध्ये येथून विजयी झाले, परंतु 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा