कोलकाता : पश्चिम बंगालमधील बरकपूरचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर गेल्या काही दिवसांमध्ये दोनदा बॉम्ब हल्ला झाला आहे. मंगळवारी त्याच्या घराच्या मागील बाजूस बॉम्ब फेकण्यात आले. यापूर्वी 8 सप्टेंबर रोजीही अशीच एक घटना घडली होती. अशात भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. अर्जुन सिंह म्हणाले की, पोलीस आणि तृणमुल कॉंग्रेस बॉम्ब हल्ले करुण मला मारण्याचा प्रयत्न करत आहे.

यापूर्वी झालेल्या घटनेनंतरही अर्जुन सिंह यांनी टीएमसीचा कट असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, भवानीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यामुळेच ममता बॅनर्जी घाबरल्या आहेत.

तृणमुल कॉंग्रेसचे म्हणणे आहे की भाजप खासदार स्वतः त्यांच्या घरावर हल्ला करत आहेत जेणेकरून त्यांना प्रसिद्धी मिळेल आणि टीएमसीची बदनामी होईल.

अर्जुन सिंह २०१९ पूर्वी तृणमुल मध्ये होते आणि २००१ पासून ते चार वेळा भाटपारा मतदार संघातून आमदार म्हणून निवडूण आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा