चंढिगड : पंजाब भाजपचे प्रवक्ते हरिमंदर सिंह यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात संतापजनक विधान केले आहे. शेतकर्‍यांना मारहाण करणे हाच त्यांच्याशी सामना करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते म्हणाले की, पंतप्रधान शेतकर्‍यांशी मानवतेची वागणूक देत आहेत. जर मी तिथे असतो, तर मी आंदोलक शेतकर्‍यांना मारहाण करून तुरुंगात टाकले असते.
हरिमंदर सिंह म्हणाले की जर मला शेतकर्‍यांशी चर्चा करायला सांगितले असते तर, मी शेतकर्‍यांना मारहान करत त्यांचे पाय मोडून तुरुंगात टाकले असते. तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सातत्याने सुरू आहे. जवळपास 9 महिन्यांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर बसले आहेत. सरकारशी 11 चर्चेच्या फेर्‍यानंतरही दोन्ही बाजूंमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांच्या धरणे संदर्भात उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना, त्यांनी केलेल्या कारवाईचा तपशील देण्यास सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा