नवी दिल्ली : भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने जर्मनीचे माजी भालाफेकपटू आणि प्रशिक्षक उवे हॉन यांची हकालपट्टी केली आहे. नीरज चोप्राने उवे हॉनच्या याच प्रशिक्षणाखाली २०१८ मध्ये जकार्ता आशियाई खेळ आणि गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले. ५९, वर्षीय हॉन १०० मीटर भाला फेकणारे जगातील एकमेव खेळाडू आहे.

उवे हॉन यांनी २०१७मध्ये नीरजला प्रशिक्षणा देण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रीय भालाफेक प्रशिक्षक म्हणून ते टोकियो ऑलिम्पिकसाठी प्रभारी होते. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजचे प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनिट्झ होते. एएफआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते उवे हॉनच्या कार्य पद्धतीवर समाधानी नाहीत. कार्यकारी परिषदेच्या दोन दिवसांच्या बैठकीत खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर, एएफआयने हॉन यांची हकालपट्टी केली.

नीरज चोप्रा देखील उवे हॉन यांच्या प्रशिक्षणाबद्दल समाधानी नव्हता. नीरज म्हणाला होता, ‘मी उवे हॉन सरांसोबत खूप वेळ घालवला आहे. त्यांनी मला प्रशिक्षण दिले आहे. मी त्यांचा आदर करतो. मी त्यांच्या कार्यकाळात २०१८ राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदके जिंकली. तथापि, मला वाटते की उवे हॉन यांची प्रशिक्षण पद्धत आणि तंत्र थोडे वेगळे होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा