काबूल : तालिबान आणि इराणमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. पंजशीरमधून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी तालिबानने जोरदार कारवाई सुरू केली आहे. तालिबानच्या या कारवाईवर इराणने इशारा दिला होता. इराणच्या या भूमिकेवर तालिबानने आक्षेप घेतला असून, पंजशीरचा मुद्दा हा आमचा अतंर्गत मुद्दा आहे, असे म्हणत तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यांनी इराणव आगपाखड केली. पंजशीरचा मुद्दा चर्चेतून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र, कोणताही मार्ग नसल्याने सैनिकी कारवाई केल्याचे तालिबानने म्हटले आहे.
पंजशीर खोर्‍यामध्ये नॅशनल रेझिस्टन्स फोर्स आणि तालिबानींमध्ये जोरदार संघर्ष झाला. पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाने हवाई हल्लेही केल्याचे म्हटले गेले. पंजशीरमधील कारवाईवरून इराणने तालिबानला इशारा दिला होता. तालिबानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये, असे इराणने म्हटले होते. पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या हस्तक्षेपाची इराणने चौकशी सुरू केली आहे.
त्यावर शाहीनने म्हटले की, पंजशीर हा आमचा अंतर्गत मु्द्दा आहे. अफगाणिस्तानच्या जनतेला स्वतंत्र्य हवे आहे. कोणत्याही देशाने आमच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी आमची इच्छा आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावाबाबत बोलताना शाहीनने म्हटले की, कोणत्याही देशाचा प्रभाव, भूमिका नाही. शेजारच्या देशासोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे शेजारचे देश आणि या क्षेत्रात असणार्‍या देशांकडून अफगाणिस्तानच्या पूनर्निमाणासाठी सहकार्य हवे आहे. सहकार्याची अपेक्षा करणे म्हणजे त्या देशाचा आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आहे, असा अर्थ होत नाही. हे आमचे धोरण नाही, असेही शाहीन यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा