पुणे : ज्येष्ठ चित्रकार देविदास पेशवे यांचे मंगळवारी सकाळी खासगी रूग्णालयात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या असा परिवार आहे.
पेशवे यांना कर्करोग झाला होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पेशवे हे मुळचे बारामतीचे. ते अभिनव महाविद्यालयात प्रशिक्षक होते. ते ‘केसरी’त अनेक वर्षे कार्यरत होते. ‘केसरी’च्या रविवार पुरवण्यातील त्यांची चित्रे आकर्षणाचा विषय ठरत. पेशवे यांनी ‘केसरी’ दिवाळी अंकातही चित्रे रेखाटली होती. पेशवे यांनी आजपर्यंत अनेक पुस्तकांची पृखपृष्ठ साकारली आहेत. दैनिके, साप्ताहिकातही त्यांनी चित्र काढली आहेत. तसेच वृत्तपत्र पुरवण्यांची सजावटही पेशवे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा