नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘अब्बा जान’ वक्तव्याच्या खरपूस समाचार घेतला. ” द्वेष करणारा योगी कसा असू शकतो?” असा सवाल राहुल यांनी केला.

रविवारी कुशीनगरमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी प्रेक्षकांना विचारले होते की, तुम्हाला रेशन मिळत आहे का आणि 2017 पूर्वी त्यांना हे रेशन कोठून मिळत होते? मुख्यमंत्री म्हणाले होते, “कारण तेव्हा ‘अब्बा जान’ नावाचे लोक रेशन खात असत. कुशीनगरचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशला जात असे. आज जर कोणी गरीब लोकांचे रेशन हिसकावण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच तुरुंगात जाईल. ”

विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे ध्रुवीकरण होईल म्हणून ‘अब्बा जान’ ची आठवण झाली असा दावा काँग्रेस नेत्याने केला. गौरव वल्लभ यांनीही योगी आदित्यनाथ यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसला लक्ष्य केल्यावर प्रत्युत्तर दिले आणि ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना हे माहित असले पाहिजे की काँग्रेसला दहशतवादाविरोधातील लढाईत बलिदानाचा मोठा इतिहास आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा