पालघर : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतांनाच पालघर मधील बोईसर येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणात एका 11 वर्षीय मुलाला पालघर मधील बोईसर येथून अटक करण्यात आली आहे.
बोईसर पोलीस स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलीस तपासात अत्याचार करणार आरोपी हा तिच्या शेजारी असून हा 7 वी इयत्तेत शिकणारा मुलगा आहे. पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा मान्य केला. मुलाच्या विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा