प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. सरकारी माध्यमाने याबाबतची माहिती दिली. या क्रूझ क्षेपणास्त्राने 1500 किलोमीटरवरील लक्ष्य अचूक टिपले. या चाचणीमुळे पुन्हा एकदा उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे.
उत्तर कोरियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्र चाचणीवेळी सत्तारुढ कामगार पक्षाचे नेते उपस्थित होते. संरक्षण क्षेत्राचे अधिकारी आणि वैज्ञानिकही उपस्थित होते. 11 आणि 12 सप्टेंबर रोजी ही चाचणी करण्यात आली. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने 7,580 सेकंदांत 1500 किलोमीटरवरील लक्ष्य भेदले.
16 आणि 26 ऑगस्ट रोजी दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्या सैन्याने युद्धसराव केला होता. त्यानंतर काही दिवसांनी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी केल्याने किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला दिलेले हे उत्तर असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धसरावादरम्यान उत्तर कोरिया भडकला होता. अमेरिकेने वॉशिंग्टन आणि सोलची सुरक्षा धोक्यात घातल्याचा आरोप केला होता. किम यो जोंगने अमेरिकेला आणि दक्षिण कोरियाला इशाराही दिला होता.
दरम्यान, अमेरिकेचे सैन्य जनरल ग्लेन वानहेर्क यांनी, उत्तर कोरियाने डागलेल्या प्रत्येक क्षेपणास्छत्राचे प्रत्युत्तर देण्यास अमेरिका तयार असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा