कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी भवानीपूरची पोट निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. तृणमूल कॉंग्रेस ही निवडणूक जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे पण याच भाजपही मागे नाही. भाजप उमेदवाराच्या पोलिंग एजंटने भवानीपूरच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून ममता यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आरोप आहे की, ममतांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्वत: विरोधात नोंदवलेल्या पाच पोलिस प्रकरणांचा तपशील दिला नाही.

आपल्या तक्रारीमध्ये भाजप उमेदवाराच्या एजंटने माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा तपशील दिला आहे. 2018 इंडिया टुडेच्या अहवालानुसार, ममतांविरोधात आसाममध्ये एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनआरसीवर ममतांनी केलेल्या टीकेनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

बंगालच्या मुख्यमंत्री पदी राहण्यासाठी ममतांना भवानीपूरमधून निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत ममतांनी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांना भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभूत केले होते. ममतांच्या विरोधात भाजपने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा