नवी दिल्ली : बीसीसीआयने आयपीएलच्या २ नवीन संघांच्या लिलावाची तयारी केली आहे. हा लिलाव १७ ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. २०२२ पासून आयपीएलमध्ये ८ ऐवजी १० संघ असतील. २ नवीन संघांच्या लिलावातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ५००० ते ६००० कोटींचा निधी मिळू शकतो. याचबरोबर संघांच्या वाढीसह, सामन्यांची संख्याही वाढणार आहे. अशा स्थितीत बीसीसीआयलाही प्रसारणातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे.
संघांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रत्येक संघाला १८ साखळी सामने खेळावे लागतील. प्रत्येक फ्रँचायझीला घरच्या मैदानावर ९ सामने आणि दूरच्या ठिकाणी ९ सामने खेळावे लागतील. सध्या प्रत्येक संघाला ७-७ सामने खेळायला मिळतात. पण संघांच्या वाढीमुळे, जर प्रत्येक संघाला १८ सामने खेळावे लागतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा