कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला करण्यात आला. गेल्या आठवड्यातही बॉम्ब हल्ला झाला होता. या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जाणार आहे. या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसने आरोप फेटाळून लावला आहे. राजकीय फायदा लाटण्यासाठी सिंह हल्ले घडवून आणत असल्याचे तृणमूलने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा