काबुल : अफगाण पोलीस पुन्हा काबूल विमानतळावर कामावर परतले आहेत. तालिबान सुरक्षा कर्मचाऱ्यांसह चेकपॉइंटवर अफगाण पोलीस तैनात आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा झाल्यानंतर अफगाण पोलीस कामावर परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या महिन्यात जेव्हा तालिबान्यांनी राजधानी काबूलवर कब्जा केला, तेव्हा पोलीस त्यांचे काय होईल या भीतीने आपल्या चौक्या सोडून गेले. दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की ते शनिवारी तालिबान कमांडर्सच्या कॉलनंतर कामावर परतले.

रविवारी, एएफपीच्या प्रतिनिधीने विमानतळाच्या मुख्य इमारतीत तसेच अनेक चौक्यांवर सीमा पोलिसांचे सदस्य तैनात असल्याचे पाहिले. पोलीस दलातील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “दोन आठवड्यांपूर्वी घरी पाठवल्यानंतर मी काल कामावर परतलो. मला एका वरिष्ठ तालिबान कमांडरचा फोन आला, ज्याने मला कामावर परत येण्यास सांगितले. तालिबानने म्हटले आहे की, लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा संस्थांसह मागील सरकारमध्ये काम केलेल्या सर्वांना माफ केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा