अमरावती : अमरावती जिह्लयात वरुड तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. बुडालेल्या व्यक्तींमध्ये आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाने सुरू केला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की,’आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे’. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा