नवी दिल्ली : तामिळनाडूत सत्ताधारी द्रवीड मुनेत्र कळघमने (द्रमुक) विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश प्रक्रियेतून (नीट) सवलत देणारे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाला भाजपवगळता सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता 12 वीच्या गुणांवर आधारित एमबीबीएस, बीडीएसमध्ये प्रवेश मिळणार आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी हे विधेयक मांडले. काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि अन्य पक्षांनी यास पाठिंबा दिला. भाजपने यास विरोध दर्शवित सभात्याग केला. रविवारी नीट परीक्षा पार पडली. मात्र, परीक्षेस काही तास असताना नापास होण्याच्या भीतीने 19 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यानंतर तामिळनाडूत अखिल भारतीय अण्णा द्रमुक आणि द्रविड मुनेत्र कळघम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाला. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्य सरकारचा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा