मुंबई :
साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहन चौहान याने गुन्हा कबूल केला आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले शस्त्रदेखील जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला असल्याचे मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोपीला सध्या 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत. गुन्हा कसा झाला याचा घटनाक्रम पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे. येत्या महिनाभरात किंवा त्याआधी संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल, असेही नगराळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत जाहीर केली आहे, अशी माहितीही नगराळे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा