पुणे : ‘आओ हुजूर तुमको सितारो में ले चलें’, ‘मधुबन में राधिका नाचे रे, ‘गुनगुना रहे हैं भंवरे खिल रही है कली कली’ या अशा विविध बहारदार जुन्या चित्रपटांतील हिंदी गीतांचा काळ गायकांनी उलगडला. ऑनलाईन माध्यमातून श्रोत्यांनीही या गीतांचा आनंद घेत चांगला प्रतिसाद दिला.
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणेशोत्सवात यंदा ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन केसरी गणेशोत्सवात सोमवारी गायक अली हुसेन आणि कल्याणी देशपांडे यांचा ‘हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम’ झाला.
‘एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनया धीमही’ या गणपतीवरील भक्‍तिगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमात ‘आओ हुजूर तुमको सितारो में ले चले’,’ आज मौसम बडा बेईमान है’, ‘दिवाना हुआ पागल’, ‘ओ सजना बरखा बहार आई’, ‘ना जा कही अब न जा दिल के सिवा’, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’, ‘मधुबन में राधिका नाचे रे’, ‘गुन गुना रहे है भंवरे, खिल रही है कली- कली’, बार बार देखो हजार बार देखो, ‘आओ ना गले लगाओ ना’, ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’, ‘ओ हसिना जुल्फोंवाली जाने जहाँ’, ‘आजा आजा मैं हुं प्यार तेरा’ तसेच दिल ही तो है या चित्रपटातील ‘लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गायक महंमद रफी, आशा भोसले, लता मंगेशकर या गायकांनी स्वरबद्ध केलेल्या जुन्या हिंदी चित्रपटांतील बहारदार गीतांचा काळ उलगडला.
गायक अली हुसेन आणि कल्याणी देशपांडे यांच्यासह पथकाचे आयोजक चिंतन मोधा, गिटारवादक हार्दिक रावळ, तबलावादक हर्षद गनबोटे, तसेच रिदम मशीनवर आसिफ खान यांनी साथसंगत केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाने या कार्यक्रमाचे चित्रीकरण, तसेच ऑनलाईन प्रक्षेपणास तांत्रिक साहाय्य केले.
केसरी गणेशोत्सवातील हिंदी गीतांच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ऑनलाइन केसरी गणेशोत्सवाचे कार्यक्रम पाहण्यासाठी https://youtube.com/c/KESARINEWSPAPER या लिंकवर पाहावे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा