नवी दिल्ली : कोरोनामुळे प्राण गमवावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात निकष तातडीने जारी करा आणि यासंदर्भातील अहवाल सादर करा, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. आता पुढील सुनावणी 23 स्पटेंबर रोजी होणार आहे.
ज्या कोव्हिड रुग्णांनी आत्महत्या केली; त्यांचा मृत्यू कोव्हिडमुळे झाला, हे सरकारला मान्य नाही. मात्र, त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे
दरम्यान, कोरोना चाचणी अथवा कोरोनाची लागण झाल्यानंतर 30 दिवसांत जर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तो कोरोना मृत्यू मानला जाणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असल्याचे वृत्त आहे.
निकष निश्चिती आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या सुलभ प्रक्रियेवरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला वारंवार फटकारले आहे. गेल्या आठवड्यातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारतानाच 30 जून रोजी दिलेल्या न्यायिक आदेशांचे तातडीने पालन करावे आणि 11 सप्टेंबर किंवा त्याआधी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे म्हटले होते. दोनच दिवसांपूर्वी, कोरोना मृत्यू प्रमाणपत्राबाबत केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली. मात्र, भरपाईच्या निकषाबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा