5 ऑक्टोबर रोजी मतदान
मुंबई :
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील 85 गट 144 गणांची पोटनिवडणूक सोमवारी जाहीर केली. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्याअंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याला आव्हान देण्यात आले होते. नागपूर खंडपीठाने ओबीसींच्या अतिरिक्त जागा रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. जानेवारी 2020 मध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 44 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. यातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून घेण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा